धक्कादायक खुलासा ! CRPF च्या 56 जवानांचा गतवर्षी ‘कॅन्सर’ने मृत्यू, ‘फोर्स’नं उचललं मोठं पाऊल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मागच्या वर्षी सीआरपीएफच्या 56 कर्मचार्‍यांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे. तर सध्या 179 कर्मचारी या आजाराने ग्रस्त आहेत. या अर्धसैनिक दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली. हे आकडे पाहून जगातील सर्वात मोठ्या केंद्रीय सशस्त्र दलाने गंभीर दखल घेतली असून आपल्या सर्व कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वार्षिक वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले आहे. या आजाराचे वेळेवर निदाण होणे हाच हा आजार घालवण्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे, असे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) प्रवक्त्याने सांगितले की, दलाने मागच्या वर्षी कॅन्सरमुळे आपले 56 कर्मचारी गमावले आणि सध्या 179 कर्मचारी ग्रस्त आहेत. या कर्मचार्‍यांवर देशातील 37 रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रवक्त्याने सांगितले की, हा आकडा दलाच्या एकुण संख्येच्या तुलनेत खुप कमी असला तरी प्रयत्न असा केला जात आहे की कोणत्याही कर्मचार्‍याला हा आजार होऊच नये.

या अर्धसैनिक दलाच्या कर्मचार्‍यांना जीवशैली योग्यप्रकारे ठेवणे, योग्य आहाराने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि नियमित योगा करण्याचे शिक्षण देण्यासाठी कोर्स सुरू करण्यात आला आहे.

त्यांनी म्हटले की, अशा रूग्णांना केअरटेकरची सुविधा देणे आणि कॅन्सरबाबत संवेदनशील बनविणे हीच कॅन्सरसोबत लढण्याची रणनीती आहे.

सीआरपीएफने कॅन्सरबाबत जागृती करण्यासाठी एनजीओ कॅस सपोर्ट सोबत रविवारी वॉक फार लाईफचे आयोजन केले होते. ज्यामध्ये दलाचे प्रमुख ए पी माहेश्वरी सहभागी झाले होते. सीआरपीएफ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते.