‘या’ 6 फॅशन टीप्स आत्मसात करा अन् तुम्ही देखील दिसाल अभिनेत्री सारख्या स्टायलिश, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    जीवनशैली कितीही व्यस्त असू द्या. पण काळाबरोबर स्टाइलिश दिसणे ही आजकाल तरुणींची एक गरज बनली आहे. स्टाइलिश दिसणे आपला आत्मविश्वासही मजबूत करते. हे ६ ड्रेस तुम्हाला स्टाइलिश दिसण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

१) प्लाजो पॅंट –

ही आकर्षक तर आहेच, पण त्यासोबत आरामदायकदेखील आहे. आपण त्यांना आपल्या अलमारीमध्ये जागा दिली पाहिजे. कॅज्युअल टॉप किंवा पारंपरिक कुर्ती हे दोन्ही गोष्टी त्या पँटवर शोभून दिसतील. त्यांना आपण ऑफिस, कॉलेज आणि घरीही आपण ते वापरू शकतो.

२) मॅक्सी कपडे –

हे अत्यंत आरामदायक आहे, कोणत्याही हंगामात आपण घालू शकतो. ते अगदी स्टायलिश लुक देते. हे कोणत्याही महिलांना आकर्षक दिसते. त्याच्यावर फूटवेअर, हिल्स, फ्लैट्सपासून व्हाइट स्नीकर्स सर्व चांगले दिसतात.

३) शॉर्ट्स –

आपण जर शॉर्ट्स वापरत नसताल तर तुमची फॅशन अपूर्ण आहे. क्रॉप टॉप, टेंक टॉप, शर्ट इत्यादीसह शॉर्ट्स स्टायलिश लुक देते.

४) जंपसुट्स आणि प्लेसुट्स –

जंपसुट्स णि प्लेसुट्सला सध्या खूप पसंती आहे. हे जितके स्टाइलिश दिसते तितकेच आरामदायक आहे.

५) भारतीय कुर्ती –

जर आपल्याला पारंपरिक लुक करायचा असेल, तर आपण भारतीय कुर्तीसह लेगिंग्ज किंवा जीन्स वापरू शकता. हेदेखील खूप स्टाइलिश दिसते.

६) स्कर्ट –

आपल्याकडे एखादा तरी स्कर्ट असावा, त्यामध्ये आपण खूपच आकर्षक दिसतो. आपण तो कुठेही घालू शकतो घर, ऑफिस, आउटिंग इत्यादी कोणत्याही वेळी हे घालू शकतो.