अविश्वसनीय ! 7 वर्षाचा मुलगा YouTube मुळं बनला ‘अरबोपती’, फोर्ब्सच्या यादीत नं. 1

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व्यक्ती फार मेहनत करत असतो. मात्र प्रत्येकजण करोडपती होऊ शकत नाही. मात्र नुकत्याच फोर्ब्सच्या यादीमध्ये समावेश झालेला एक मुलगा वयाच्या केवळ सातव्या वर्षी आपल्या कष्टाने अरबपती बनला आहे.

फोर्ब्सने यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींची यादी घोषित केली असून यामध्ये रॉयन नावाच्या या मुलाचा पहिल्या क्रमांकावर समावेश आहे. खेळण्यांचे रिव्यू करून त्याने हे पैसे कमवले आहेत. त्याच्या युट्युब चॅनलने एक वर्षात सर्वात जास्त कमाई केली आहे. रॉयन टॉयज रिव्यू असे त्याच्या चॅनलचे नाव असून तो या चॅनलचा होस्ट आहे. बाजारात येणाऱ्या प्रत्येक नवीन खेळण्याचा तो रिव्यू करत असतो. मागील वर्षी त्याचा हा चॅनेल फोर्ब्सच्या यादीत आठव्या क्रमांकावर होता.

मात्र यावर्षी त्याने मोठी झेप घेत थेट पहिला क्रमांक पटकावला. त्याच्या घरातील सदस्यांबरोबर तो हा चॅनल चालवत असून एक जून 2017 ते 1 जून 2018 या कालावधीत त्याने जवळपास 22 मिलियन डॉलर कमावले होते. दरम्यान, त्याने आतापर्यंत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांपेक्षा देखील जास्त पैसे कमवले आहेत.

Visit : Policenama.com