गुजरात : कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढीचं ‘गिफ्ट’, 3 हप्त्यात महागाई ‘भत्ता’ देखील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सातव्या वेतन आयोगाची शिफारस लागू करून गुजरात सरकारने राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पगार वाढीची मोठी भेट दिली आहे. गुजरात सरकारने बुधवारीच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5 % नी वाढवत 12 % वरून तो 17 % पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 1 जुलै 2019 पासून देखील लागू होईल. म्हणजेच जुलै ते जानेवारी पर्यंतचा एरिअर देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ
गुजरात सरकारने नुकतेच राज्याच्या लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधारकांना खुशखबरी देत त्यांचा महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवून 17 टक्के केला आहे. सरकार द्वारे केल्या गेलेल्या वाढीनंतर कर्मचाऱ्यांना 17 % महागाई भत्ता मिळणार आहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले की, नवीन डीए जानेवारीच्या पगारासोबत मिळेल.

3 हप्त्यांमध्ये एरियरचे वाटप
नितीन पटेल यांनी सांगितले की, कर्मचार्‍यांच्या पगाराच्या वाढीबरोबरच त्यांना जुलै 2019 पासून आतापर्यंत वाढीची थकबाकी (एरियर) मिळणार आहे. थकबाकी दोन ते तीन हप्त्यात दिली जाईल. पटेल यांच्या म्हणण्यानुसार थकबाकी देयकाबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल. गुजरात सरकारच्या निर्णयामुळे तिजोरीवर 1821 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्याचा लाभ राज्यातील पंचायत कर्मचार्‍यांनाही देण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकार वाढवू शकते टॅक्स
महाराष्ट्रात आधी असलेल्या भाजप सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा लाभ दिला होता. तसेच कर्मचाऱ्यांना एरियर देण्याबाबतची देखील घोषणा केली होती. महाराष्ट्र सरकरकडून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना शिल्लक एरियर देणे अजून बाकी आहे.

सुमारे 25000 कोटी थकबाकी अद्याप बाकी आहे, परंतु शासकीय तिजोरी खाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेले संकेत जरा आश्चर्यचकित करणारे आहेत. सरकार अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगांतर्गत थकबाकी आणि कर्ज माफीसाठी टॅक्समध्ये वाढ करू शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे आहे की सरकार कर वाढवून कर्मचार्‍यांच्या थकबाकीची भरपाई करेल. महाराष्ट्र सरकारला कर्मचाऱ्यांना चार वर्षाचा एरियर देणे बाकी आहे.मात्र यावेळी अशा प्रकारची कोणतीही अधीकृत घोषणा अद्याप केली गेलेली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like