81 मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने मूळ मालकाना परत 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – चिंचवड पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केलेल्या 114 मोबाईल पैकी 36 आणि भोसरी पोलिसांनी जप्त केलेले 45 असे एकूण 81 मोबाईल संच आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 11 लाख 67 हजार 190 रुपयांचा ऐवज मूळ मालकाना पोलिसांनी दिला. यामुळे मूळ मालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

चिंचवड पोलिसांनी रस्त्याने जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून तब्बल 114 मोबाईल जप्त केले. पोलिसांनी यातील 65 जणांचा (मूळ मालक) शोध घेतल्या पैकी 36 मूळ मालकाना आज चिंचवड पोलिस ठाण्यात त्यांचे मोबाईल देण्यात आले. चार लाख 68 हजार 580 रूपये किमतीचे मोबाईल अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक प्रदीप लोंढे, विस्वजीत खुळे, सहायक निरीक्षक अभिजीत जाधव व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

यावेळी भोसरी पोलिसांनी जप्त केलेले चार लाख 59 हजार 210 रुपयांचे 45 मोबाईल आणि दोन लाख 39 हजार 400 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने मूळ मालकाना देण्यात आले.