राजस्थानमधील बस आणि बोलेरोच्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील बिगोडजवळ सोमवारी रात्री बस आणि बोलेरोचा अपघात झाला. यात १५ जखमी ९ जणांचा मृत्यू झाला आहे आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बोलेरोमध्ये असलेली मंडळी एका विवाह सोहळ्यावरून घरी परतत होती. ही बस कोटा जिल्ह्यातून भीलवाडा बस डेपोच्या दिशेने जात होती. तर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना भीलवाडा येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या भीषण अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच जखमींना योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. मृतांमध्ये 5 पुरुष, 3 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. 15 जण जखमी झाले आहेत. ते खंधारा गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. गेहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी एक ट्विट केलं आहे.