राज्यातील 9 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या ; अशोक मोराळेंची पुण्याच्या गुन्हे शाखेत अप्पर आयुक्‍तपदी नियुक्‍ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने पोलिस उपायुक्‍त दर्जाच्या तसेच काही पोलिस उप महानिरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान, अशोक मारोळे यांची पुण्याच्या गुन्हे शाखेत अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणून बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे
निलेश आनंद भरणे (पोलिस उपायुक्‍त, गुन्हे, नागपूर शहर ते अप्पर पोलिस आयुक्‍त, गुन्हे, नागपूर शहर), महेश आर. घुर्ये (सहाय्यक पोलिस महानिरीक्षक, मुख्य संपादक, दक्षता मासिक, मुंबई ते पोलिस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, नागपूर – पद अवनत करून पदोन्‍नतीने), संजय एच. शिंदे (बदली आदेशाधीन ते अप्पर पोलिस आयुक्‍त, प्रशासन, पुणे शहर. टीप अप्पर पोलिस आयुक्‍त साहेबराव पाटील यांच्या सेवानिवृत्‍तीनंतर), राजेंद्र बी. डहाळे (पोलिस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते पोलिस उप महानिरीक्षक, बिनतारी संदेश यंत्रणा, पुणे), अशोक आर. मोराळे (पोलिस अधिक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे ते अप्पर पोलिस आयुक्‍त, गुन्हे शाखा, पुणे शहर), निसार तांबोळी (पोलिस उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई ते पोलिस उप महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई – सध्याचे अप्पर पोलस महासंचालक आणि मुख्य दक्षता अधिकारी सिडको हे पद अवनत करून), जालिंदर दत्‍तात्रय सुपेकर (पोलिस अधिक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक ते पोलिस उप महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), डॉ. जय वसंतराव जाधव (पोलिस उप महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते संचालक (ऑपरेशन), पोलिस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई) आणि एम.के. भोसले (संचालक (प्रशासन) तथा पोलिस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई ते पोलिस उप महानिरीक्षक, सुधार सेवा, मध्य विभाग, औरंगाबाद).