शिर्डीत 9 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून ‘अत्याचार’ !

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली असतानाच शिर्डीत एका शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरगाव येथे ही घटना घडली असून 9 वर्षाच्या शालेय मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर मुलीचे अपहरण करण्यात आले होते. आरोपीने पीडितेला दुचाकीवरून अज्ञात स्थळी नेऊन तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरण, बलात्कार, पॉस्को आणि अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध सरु असून पीडित मुलीवर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे, आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची किळसवाणी आणि घृणास्पद घटना औरंगाबाद मध्ये घडली. धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून स्वतःच्या जन्मदात्या आईवर हा नराधम मुलगा अत्याचार करत होता. शुभम भालेराव (वय -20) असं या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like