मुंबईत 7 मजली इमारतीचा भाग कोसळला

पोलिसनामा ऑनलाईन – पावसामुळे मुंबई गेल्या काही दिवसांत इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच डोंगरी भागात सात मजली इमारतीचा भाग कोसळला आहे. त्यामुळे त्याठिकाणी महिला अडकल्याची माहिती अग्निशमक दलाने दिली आहे. त्यामुळे बचाव कार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इमारत नेमकी कशी कोसळली आणि यात आणखी कोणी अडकले आहे का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर बचाव कार्य सुरू असून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमक दलाने दिली आहे. काल रात्रीच्या सुमारास नालासोपार्‍यातही इमारत कोसळल्याची घटना घडली होती. नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर इथे रात्री दीडच्या सुमारास साफल्य इमारत कोसळली. या इमारतीत 5 कुटुंब राहत होते. कुटुंबीयांना चाहुल लागताच ते बाहेर निघाले आणि मोठा अनर्थ टळला. पण यावेळी घरातील सामानाची हानी झाली आहे.