तरुणाने ‘तोंडात’ फोडला सुतळी ‘बॉम्ब’, मस्करी आली अंगलट!

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पूर्णा-परळी-हैदराबाद रेल्वेच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये तरुणाच्या तोंडात सुतळी बॉम्ब फुटल्याची घटना घडली. यात एक तरुण गंभीर जखमी घटना झाल्याची घटना सोमवारी (23 डिसेंबर) रेल्वे स्थानकात घडली.

यात जखमी तरुण सय्यद अक्रम हा परभणी जिल्ह्यातील पाथरी गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. हा तरुण 19 वर्षीय आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाथरी येथील सय्यद अक्रम हा आपल्या आई आणि बहिणीसोबत हैदराबादला जाण्यासाठी पूर्णा-परळी-हैदराबाद रेल्वेतून प्रवास करत होता. परळी रेल्वे स्थानकात रेल्वे आली असताना डब्यातील एका टॉयलेटमधून अचानक मोठा आवाज झाला.

प्रवाशांनी जेव्हा आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा सय्यद अक्रम हा तरुण गंभीररित्या जखमी आढळला. तोंडात बॉम्ब फुटल्याने त्याचे तोंड गंभीररित्या भाजले होते. प्रवाशांमध्ये चर्चा आहे की सय्यदने स्वत: तोंडात सुतळी बॉम्ब फोडला. आता त्याला अंबाजोगाईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/