औरंगाबादेत पुन्हा तलवारीचा मोठा साठा जप्त

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईन

मागील तीन महिन्यांपूर्वी ऑनलाईन तलवारी मागवणाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. गुन्हे शाखेने आज (गुरुवार) केलेल्या कारवाईत सहा जणांना अटक करुन तब्बल १९ तलवारी जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण औरंगाबाद शहरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व तलवारी धरादार असून त्या हर्सुल परिसरातील जहाँगिर कॉलनीतून जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे इतर तीन साथिदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाडे-घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c7098ea-c7d9-11e8-887c-3df0eccd60a1′]
आलिम खान रहिम खान पठाण (रा. जहांगिर कॉलनी, हर्सूल) याच्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असून तो प्राणघातक शस्त्रे विक्री करीत असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हेशााखेचे निरीक्षक मधूकर सावंत यांना दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, अफसर शहा, विकास माताडे, विलास वाघ, संजय जाधव, शिवाजी भोसले, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड आणि संजीवनी शिंदे यांनी आलीमच्या घरावर छापा मारला. तेव्हा त्याच्या घरात दोन धारदार तलवारी मिळाल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्याच कॉलनीत राहणाऱ्या अनेकांना तलवारी विक्री केल्याची कबुली दिली.
[amazon_link asins=’B073FKXQ9H,B07145FXKJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97b397c5-c7d9-11e8-8711-9737e7bb1a8b’]
त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख मोहसीन शेख मतीन याच्याकडून चार तलवारी  तर आरोपी नफीस शहा शरीफ शहाकडून तीन तलवारी जप्त केल्या, इलियास उर्फ इलू इसाक कुरेशीकडून दोन तलवारी, शेख परवेज शेख महेराज , शेख आमेर शेख इकबाल, शेख कलीम उर्फ इलियाज, शेख असर , शेख आवेज शेख मेहराज यांच्या घरातून प्रत्येकी एक अशा एकूण १९ तलवारी जप्त केल्या.