‘TikTok’ स्टार फैसल शेखविरोधात ‘या’ प्रकरणी एका वकिलानं दाखल केली ‘केस’, आता येताहेत धमकीचे फोन

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशभरात 21 दिवस लॉकडाऊन आहे. असं असलं तरीही काही लोक परिस्थितीचं गांभीर्य नसल्यासारखं घराच्या बाहेर फिरताना दिसत आहे. अशांवर प्रशासनाकडून कारवाईदेखील केली जाताना दिसत आहे. याच प्रकरणी आता टिकटॉक स्टार फैसल शेख च्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. फैसल शेखनं अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तो घराच्या बाहेर दिसत होता. हे पाहिल्यानंतर एका वकिलानं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

हे प्रकरण चर्चेत येण्याचं आणखी एक कारण आहे. फैसलविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणाऱ्या वकिलानं आरोप केला आहे की, जेव्हापासून त्यानं या टिकटॉक स्टार विरोधात तक्रार दाखल केली आहे तेव्हापासून त्याला सतत धमकीचे फोन येत आहेत. अली काशिफ खान असं या वकिलाचं नाव आहे. वकिलाचं म्हणणं आहे की, त्याला सदर तक्रार मागे घेण्यासाठी धमकावालं जात आहे. इतकंच नाही तर त्याला सोशल मीडियावरही शिवीगाळ केली जाताना दिसत आहे.

वकिल अली काशिफ खाननं फैसल शेख उर्फ mr. Faisu विरोधात तक्रार दाखल केली की, तो लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर जाऊन व्हिडीओ बनवत आहेत. अंबोली पोलीस ठाणे तसेच सायबर क्राईममध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर अली काशिफला धमकी दिली जाताना दिसत आहे. एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत वकिलानं या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.

याआधीही फैसल चर्चेत आला आहे. त्यानं धर्माबद्दल वक्तव्य करणारं एक व्हिडीओ शेअर केलं होतं. यावरून खूप वाद झाला होता. यानंतर टिकटॉक स्टारनं त्याच्यावर अॅक्शन घेत फैसलचं टिकटॉक अकाऊंट डिलीट करवलं होतं. यानंतर पुन्हा त्यानं टिकटॉकवर वापसी केली आहे. परंतु आपल्या काही गोष्टींमुळं तो सतत वादात सापडताना दिसत आहे.