काय सांगता ! होय, ‘करोना’च्या दहशतीमुळे ‘नवरा-नवरी’मध्ये ठेवावं लागलं 3 फुटाचं अंतर, ‘हे’ नवे नियम

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. असे असताना शनिवारी एकही रुग्ण आढळून आला नसल्याने पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच पुण्यात कोरोना व्हयरसचे आढळून आलेल्या 10 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे.

पुण्यात आढळलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या धोक्यामुळे प्रशासनाला वेगळाच निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सामूहिक लग्नासाठीची एसओपी विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे  की, वधू आणि वर हे एकमेकांपासून तीन फुट अंतर ठेऊन उभे राहतील. दोघेच आत जातील, नातेवाईकांनी लग्नाला जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सामूहिक लग्नाबाबत प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी लोकांमधून अनोखी मागणी होत असल्याचे समोर येत आहे. लग्न रद्द करण्यासाठी मंगल कार्यालयाकडून रिफंड मिळवून देण्याची खात्री द्या, अशी मागणी लोकांमधून होत आहे. काही लोकांनी तर विभागीय आयुक्तांकडे अशा प्रकारची मागणी केली आहे. आता याबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते आणि कोणती प्रतिक्रिया देते याकडे नव्या वधू आणि वरांसोबत इतर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.