‘स्वाक्षरी’मध्ये फक्त ‘नाव’ लिहिणारी व्यक्ती असते एकदम ‘निराळी’, जाणून घ्या तज्ञ डॉ. नवनीत मानधनी काय सांगतात

पोलीसनामा ऑनलाइन – सही कशी करावी हे प्रत्येकाचे अवचेतन मन (subconscious mind) त्याला सांगत असते. आणि तो व्यक्ती आपले जीवन कसा जगतोय आणि त्याला काय करायचं आहे हे त्याच्या सहीवरून दिसून येते. मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा लोकांबद्दल जे फक्त सहीमध्ये स्वतःचं नाव लिहितात. कशाप्रकारे लिहितात, त्यावर आज मी बोलणार नाही, सहीत फक्त नाव लिहिणाऱ्या व्यक्ती कशा असतात हे पाहूया.

1 अशा व्यक्ती फार जास्त परिश्रमी असतात.

2 अशा व्यक्ती कमी वयातच आपल्या करिअरची सुरुवात करतात.

3 आपल्या वडिलांपेक्षा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात.

4 अशी लोकं खूप जास्त महत्त्वाकांशी असतात.

5 कोणत्याही गोष्टीबद्दल तडजोड (compromise) करंण, त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांना जीवलग मित्र खूप कमी असतात.

6 अशा लोकांच्या वयाच्या उत्तरार्धात म्हणजे चाळीशीनंतर स्वास्थ्यसंबंधी तक्रारी वाढतात.

7 ही लोकं लवकर इतरांवर विश्वास ठेवत नाहीत.

8 अशी लोकं खूप लवकर खचून (demotivate) जातात.

9 या लोकांवर स्वतःच्या आई-वडिलांचा प्रभाव फार कमी असतो व अशी लोकं स्वहित पहिले बघतात.

10 अशा लोकांच्या विवाहित जीवनात काही तडजोडी असतात, त्यांचं त्यांच्या वैवाहिक भागीदाराशी जमत नाही.

तुमच्या सहीबद्दल /लोगोबद्दल असणाऱ्या प्रश्नांचे आम्ही स्वागत करतो. असे सर्व प्रश्न नवनीत क्रिएशन (NAVNEET CREATION) च्या फेसबुक पेजवर किंवा YOUTUBE चॅनेलवर कमेंटमध्ये विचारावेत, ही विनंती.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)

क्रमशः