मुरबाडमध्ये टेम्पोच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन

अरुण ठाकरे.

भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोची धडक दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तसेच या टेम्पोची धडक तीन रिक्षांना बसल्याने रिक्षांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज (मंगळवार) मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील तीन हात नाक्याजवळील पोलीस चौकी समोर झाला. भालचंद्र रघुनाथ वेंखडे (वय-३६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’63a23130-cbd0-11e8-bd0b-03c0729b4393′]

मिळालेल्या माहितीनुसार, भालचंद्र वेंखडे हा कल्याणहून मुरबाडला दुचाकीवरुन येत होता. महामार्गावरील तीन हात नाका पोलीस चौकीच्या समोर विरुद्ध बाजूने येणाऱ्या छोटा हात्ती टेम्पोची (एमएच ०६ बीएल ६१९९) धडक त्याच्या दुचाकीला बसली. यामध्ये भालचंद्र हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

[amazon_link asins=’B019FGR5ZC,B019XSHB7O,B07DFPG3NH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8587dde7-cbd0-11e8-8ebb-f1651a22ff72′]

मृत भालचंद्र वेंखडे हा मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष किसन कथोरे यांचा मावस भाऊ होता. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेत तणाव दूर करुन टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले.
या आपघाता मुळे राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण, अवैध पार्किंग, मासळी बाजार व महत्वाचा तीन हात नाका या महत्वाच्या ठिकाणी गतीरोधक नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर वाहन चालकांना जीव मुठीत धरुन जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी गतीरोधक करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मुरबाड शहरात प्रवेश द्वारापासुन धोकादायक पोल, अवैध पार्कीग, फुटपाथ वरिल अतिक्रमण यामुळे आपघाताची शक्यता आहे. त्यामुळे नगरपंचायतीने अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईव्हीएम मशीनचे दहन

सांगवीत १४ लाखांची घरफोडी

पिंपरी :  औंध कॅम्प रक्षक सोसायटीत सोमवारी पहाटे घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंगला क्रमांक २२ मधुन चार लाख रुपये रोख,अमेरिकन डॉलर,घड्याळे, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, लॅपटॉप असा एकुण १४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अज्ञात चोरट्याने बंगल्यात प्रवेश करून ७ ऑक्टोबरच्या दुपारी दोन ते  ८ ऑक्टोबर सकाळी आठ या कालावधीत रक्षक सोसायटीत घरफोडी केली. ललिता दिपक बागवे (वय ६२,रा. रक्षक सोसायटी) यांनी या चोरी प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी सुमारे १४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळवुन नेला. रक्षक सोसायटीतील या चोरीच्या तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.  सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस.सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.