कामाची गोष्ट ! आता ‘भाडे’कराराद्वारे ‘असा’ बदला ‘आधार’कार्ड वरील पत्ता, पण ‘या’ 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नवीन वर्षात जर तुम्ही घर बदलले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण आधार कार्डाचा वापर हा राहण्याच्या ठिकाणाचा पुरावा (अ‍ॅड्रेस प्रुफ) म्हणून केला जातो. यासाठी नवीन पत्ता अपडेट करणे गरजेचे असते. आधार कार्ड देणार्‍या यूआयडीएआय म्हणजेच यूनिक आयडेंटीटी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया योग्य पुरावे दिल्यास आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याचा पर्याय देते. परंतु, आता तुम्ही आधारच्या सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर जाऊन सहजपणे पत्ता बदलू शकता. यासाठी भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे. कारण आता भाडेकरारही योग्य पुरावा म्हणून ग्राह्य धराला जातो.

भाडेकरार हा त्या 44 आयडीप्रुफच्या यादीमधील एक आहे, ज्यास यूआयडीएआयने मान्यता दिली आहे. यामध्ये पासपोर्ट, बँक पासबुक, स्टेटमेंट, व्होटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बील, पाणी आणि विज बीलाचाही समावेश आहे.

पत्ता बदलताना या गोष्टी लक्षात ठेवा
प्रथम भाडेकराराची नोंदणी करा. जर भाडेकरार नोंदणीकृत नसेल तर यूआयडीएआय तो नाकारू शकते. भाडेकराराचे प्रत्येक पान वेगवेगळे स्कॅन करून ते वेगवेगळे अपलोड करा. जर तुम्ही भाडेकराराची सर्व पाने एकदाच अपलोड केली तरी तो नाकारला जाऊ शकतो.

1 प्रथम णखऊअख ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा.
2 होमपेज वर चू अरवहररी टॅबवर जा.
3 अ‍ॅड्रेस अपडेट रिक्वेस्ट (ऑनलाइन) च्या टॅबवर क्लिक करा.
4 नवीन पेज उघडल्यावर अपडेट अ‍ॅड्रेस टॅब वर क्लिक करा.
5 आता जे पेज उघडेल त्यामध्ये तुमच्या आधार कार्डची माहिती भरून लॉग-इन करा.
6 लॉग इन केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.
7 दिलेल्या कॉलममध्ये ओटीपी टाकून पोर्टलवर जा.
8 येथे तुम्ही तुमचा नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करा.
9 अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक रेफ्रन्स नंबर मिळेल.
10 रेफ्रन्स नंबर घेऊन आधार केंद्रात जा आणि तुमचा सध्याचा पत्ता द्या. यानंतर तुमचे नवे आधार त्या पत्त्यावर पाठविले जाईल.
11 जर तुम्ही सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर आधार कार्डाच्या पत्त्यात बदल करत असाल तर तुम्हाला भाडेकराराची सर्व पाने स्कॅन करावी लागतील. तुम्ही त्यास पीडीएफ फॉर्म्याटमध्ये सुद्धा कन्व्हर्ट करू शकतो.
12 जर तुम्ही आधार सेवा केंद्रात जाऊन आधार कार्डमधील पत्ता बदलणार असाल तर यासाठी तुम्हाला भाडेकराराची मुळ प्रत सोबत घेऊन जावे लागेल. जर तुम्ही याची झेरॉक्स कॉपी घेऊन गेलात तर तुमचे काम होणार नाही.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/