Aaditya Thackeray | ‘मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरक कळत नाही’, आदित्य ठाकरेंची मुंबईतील रस्त्यांवरून टीका

मुंबई : Aaditya Thackeray | मुंबईतील रस्ते पूर्ण होत नाहीत याला जबाबदार आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आहेत. ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा फरक मुख्यमंत्र्यांना कळत नाही, अशी जोरदार टीका शिवसेना (Shivsena) नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारवर (State Govt) टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने करत आहात. एमटीएचएलचे ८३ टक्के काम आमच्या सरकारमध्ये पूर्ण झाले आहे. आता उद्घाटनाला एवढा वेळ लागत आहे. हे काम अजून तयार नाही? दीड महिना स्वतःच्या स्वार्थासाठी पेंडिंग ठेवले आहे.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, नवी मुंबई मेट्रोचे काम असेच ५ महिने ठेवले आहे. दिघी स्टेशन ८ महिन्यांपासून तयार आहे. पण व्हीआयपी लोकांना उद्घाटनाला वेळ मिळत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यात उद्घाटन करता येत नाही, मग राज्यातील उद्घाटने काय करणार.

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईची लूट आम्ही होऊ देणार नाही. ज्या रोडचे कंत्राट रद्द केले ते कंत्राटदार कोर्टात गेले आहेत.
नवीन रस्त्याचा निविदा काढली त्यात ३०० कोटी कमी केले आहेत. आधीचे कंत्राटदार कोर्टात गेले आणि नवीन टेंडर वर
स्टे आणला आहे. ११ जानेवारीपर्यंत टेंडरवर स्थिगिती आहे. आयुक्तांसोबत आम्ही यायला तयार आहोत.
किती रस्ते झाले ते दाखवा?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | सरकारची धडधड वाढली, जरांगे २४ डिसेंबरच्या अल्टीमेटमवर ठाम, म्हणाले, ”कोरोनाच्या नावाखाली…”

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांचे धक्कातंत्र; जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करत, सरकारवर उपरोधिक टीका!

Police Accident News | कर्तव्य बजावून घरी जात असताना पोलीस अधिकाऱ्याचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू, नाशिक पोलीस दल हळहळले

Vijay Wadettiwar On Sanjay Raut | ‘शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवणार’, राऊतांच्या दाव्यावर वडेट्टीवारांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…