‘या’ शेअरने 5 महिन्यात 1 लाखाचे बनवले 7 लाख रुपये, जाणून घ्या ‘कारभार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकले. तो शेअर बाजार अजूनही जानेवारी महिन्याच्या तुलनेत जवळजवळ 10 टक्क्यांनी घसरलेला आहे. 23 मार्चच्या लोअर सर्किट नंतर बाजारात आत्तापर्यंत मजबुती कायम आहे.

मार्च पासून आत्तापर्यंत काही शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. त्यामध्ये फार्मा कंपनी आरती ड्रग्सचा समावेश आहे. आरती ड्रग्सने मार्च पासून आत्तापर्यंत 7 पट रिटर्न दिलं आहे.

शुक्रवारी म्हणजे 21 ऑगस्ट आरती ड्रग्सच्या शेअर्स मध्ये अपर सर्किट लागला होता. याचे शेअर बीएसई वर 10 टक्के वाढून 3122.75 वर बंद झाले होते. त्या दिवशी अपर सर्किट लागण्याचे अजून एक कारण म्हणजे, कंपनीच्या बोर्डाकडून प्रत्येक फुली पेड अप इक्विटी शेअरच्या बदल्यात 3 बोनस शेअर देण्याची घोषणा करण्यात आली होती.

तसं पाहिलं तर कोरोना काळात सर्व फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी राहिली आहे. कारण या काळात कोरोनावर उपचार करण्यासाठी अनेक औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. 23 मार्च 2020 दिवशी आरती ड्रग्सच्या शेअर्सचा भाव 421 रुपये इतका होता. त्या वेळी बाजारात लोअर सर्किट लागले होते. पण आता आरती ड्रग्सच्या शेअर्सचा भाव 3133 रुपयांवर पोहचला आहे.

म्हणजे, जर कोणी 23 मार्चला आरती ड्रग्सच्या शेअर्स मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे पैसे 21 ऑगस्टला 7 लाख इतके होतील. 2020-21 या वित्तीय वर्षामध्ये पहिल्या तीन महिन्यात कंपनीचा नफा दरवर्षीच्या तुलनेत 280.62 अंकांनी वाढून तो 85.45 कोटी रुपये झाला आहे.

आरती ड्रग्स ही एक फार्मा कंपनी आहे, जिचा कारभार खूप वेगाने वाढत आहे. ही कंपनी ऍक्टिव्ह फार्मसुटीकल इन्ग्रेडीएन्ट उपलब्ध करून देते. तसेच अँटी-इन्फ्लेेमेटरी, अँटी फंगल, अँटिबायोटिक साठी देखील कंपनी काम करते.