पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी अभिनव देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकपदी अभिनव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पूर्वी कोल्हापूर येथे अधीक्षक होते. राज्यातील अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज गृहविभागाने काढले आहेत.

पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप पाटील यांची गेल्या आठवड्यात पदोन्नतीने गडचिरोलीच्या उपमहानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली. पाटील यांनी यापूर्वीही नक्षलग्रस्त भागात काम केले होते. त्यांची येथे बदली झाली होती. यानंतर पुणे ग्रामीण अधीक्षक पदावर कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
मुंबईत सध्या असणाऱ्या दोन अधिकाऱ्यासह अभिनव देशमुख यांचे नाव आघाडीवर होते. त्यात आज बदल्यांचे आदेश देण्यात आले. त्यात अभिनव देशमुख यांनी अधीक्षक म्हणून वर्णी लागली आहे. दरम्यान अभिनव देशमुख सक्त आणि कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. अवैध प्रकारणांना आळा घालण्यात त्यांचे नाव लौकिक आहे.