मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा सुरू होणार ?, मध्य रेल्वेने केला ‘हा’ खुलासा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल अडीच महिन्यांपासून बंद असलेली लोकल ट्रेन पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्रा, मध्य रेल्वेने लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. परंतु, सरकारकडून अजूनही कोणतेही आदेश आले नाहीत, त्यामुळे निर्णय घेण्यात आला नाही. उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अनेक चर्चा पसरत आहे. परंतु रेल्वे पुन्हा सुरू करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचे निर्देश मिळालेले नाहीत, त्याबाबातच्या सूचना आम्हाला मिळताच माहिती दिली जाईल. असे ट्विट सुतार यांनी केले आहे.