उर्मिला मातोंडकर बद्दल आक्षेपार्ह पोस्ट, पुण्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उर्मिला मातोंडकर बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकाराने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

धनंजय कुरतडकर नावाच्या एकाने ही पोस्ट लिहीली आहे. आता त्याच्या फेसबुक खात्यावरून ही पोस्ट काढून टाकण्यात आली आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाईलनुसार तो भाजपचा कट्टर समर्थक आहे. त्याने शरद पवार, सोनिया गांधी आणि इतरांबद्दलही आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत. परंतु त्याने उर्मिलाबद्दल अश्लील भाषेत पोस्ट लिहिल्याने खळबळ उडाली. पुण्यातील कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट त्याच्या घरावर मोर्चा काढला. त्यानंतर धनंजय कुडतरकर याने पोलीस ठाण्यात धाव घेत संरक्षण घेतले. महिला आक्रमक झाल्या असून याप्रकरणी तक्रार केली आहे. तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कलगुटकर यांनी सांगितले की, यासंदर्भात आम्हाला तक्रार मिळाली आहे. त्यावर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like