1000 ची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अजामीनपात्र वॉरंटची कारवाई करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. राहुरी पोलिस ठाण्यात आज रात्री कारवाई करण्यात आली.

भाऊसाहेब दौलत पवार (वय 27, पोलीस शिपाई ब.न. 2660, नेमः- राहुरी पोलीस स्टेशन, अहमदनगर, वर्ग 3 रा:- उस्मान शेख यांचे मालकीचे भाड्याचे घरात, करपे इस्टेट, राहुरी बुद्रुक, मूळ रा- पाटेकर वस्ती, ढोरजळगाव, ता शेवगाव. जि. अहमदनगर) हे लाचखोरीच्या जाळ्यात अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदारांविरुध्द न्यायालयातून अजामीनपात्र वारंट काढण्यात आले होते. सदर वारंटची बजावणी तक्रारदारांवर न करता, सदर वारंट न्यायालयातून रद्द करुन घेऊन वारंटची कारवाई टाळणेकरिता पोलीस कर्मचारी भाऊसाहेब पवार यांनी मदत केली. मदत केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून एक हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. यावरून पोलीस अधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकाने राहुरी पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई भाऊसाहेब पवार याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज रात्री रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Loading...
You might also like