ACB Trap News | 30 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; पोलिस दलात प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन – तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये (Complaint Application Inquiry) मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेताना जालना जिल्हयातील अंबड पोलीस ठाण्यातील (Ambad Police Station) पोलीस उपनिरीक्षकाला (Police Sub-Inspector) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. योगेश हरी चव्हाण PSI Yogesh Hari Chavan (वय-39) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या (ACB Trap News) या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर एसीबी कार्यालयात (ACB Trap News) तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी संतोष हरणे (Santosh Harne) यांच्याशी गट क्रमांक 718 क्षेत्रातील 5 एकर 29 गुंठ्याचा व्यवहार केला आहे. मात्र, यामध्ये वाद झाल्याने संतोष हरणे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला आहे. तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये तक्रारदार यांच्या बाजूने मदत करुन देण्यासाठी पीएसआय योगेश चव्हाण यांनी सुरुवातीला तक्रारदार यांच्या मित्राच्या मदतीने दहा हजार रुपये लाच स्वीकारली.त्यानंतर योगेश चव्हाण यांनी आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली. (Jalna ACB Trap)

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Chhatrapati Sambhaji Nagar ACB Trap News) याबाबत तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पीएसआय योगेश चव्हाण यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल फुला (PIRahul Phula) यांच्यासह शिरीष वाघ, राजेंद्र सिनकर, चांगदेव बागुल यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून झोन-2 मधील 3 सराईत गुन्हेगार तडीपार

बनावट कागदपत्रांच्या आधारे सारस्वत बँकेची 27 लाखांची फसवणूक, बिल्डरसह चार जणांविरुद्ध FIR, एकाला अटक

सुरक्षारक्षकांना मारहाण करुन किर्लोस्कर कंपनीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी, 7 ते 8 जणांवर FIR

ACB Trap News | 95 हजारांची लाच घेताना शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक,
शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरचा हॉट अंदाज; नेटेट टॉपने वेधले सर्वांचे लक्ष

विमानतळ परिसरात दहशत माजवणाऱ्या चिक्या गायकवाड व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 52 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA