घृणास्पद ! दगडाने ठेचून महिलेचा खून, नराधमाकडून मृतदेहावर 3 तास बलात्कार

आझमगड (युपी) : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे एकाच कुटुंबातील तीन जणांचा निर्घृण खून आणि दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत खळबळजनक खुलासा समोर आला आहे. या खुलाशाने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. आरोपीने खून केलेल्या तिघांमध्ये एका महिलेचा समावेश होता. याच महिलेच्या मृतदेहावर त्याने तब्बल तीन तास अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

आझमगडमधील मुबारकपूर येथे 24 नोव्हेंबर रोजी खूनाचा प्रकार घडला होता. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. तपसादरम्यान आरोपीने इतर राज्यात देखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

आरोपीने ज्या कुटुंबातील व्यक्तींचा खून केला त्यामध्ये चार महिन्याच्या एका चिमुकल्याचा समावेश आहे. आरोपीने दाम्पत्यासह चिमुकलीचा निर्घृण खून केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने त्यांच्या दोन मुलांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आगोदर 35 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर तिच्यावर तीन तास अत्याचार केले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like