काय सांगता ! होय, चक्क शहराला पुरात बुडवणार्‍या 27 अधिकार्‍यांवर ‘अ‍ॅक्शन’, 14 इंजिनिअर तडकाफडकी ‘निलंबीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी बिहारची राजधानी पटणा येथे मुसळधार पावसाने कहर माजवला होता. या पावसामुळे सामान्यांबरोबर राज्य सरकारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पटणासह राज्यातील अनेक भागात पावसामुळे 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. राजधानी पटणा येथे आता पाणी साठण्याच्या प्रकरणात राज्यातील 27 अधिकात्यांना धारेवर धरले आहे. यात आयएएस अधिकारी अमरेंद्र प्रताप सिंह यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पटणा महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अनुपम कुमार सुमन यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची शिफारस देखील केली जात आहे.

सोमवारी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पटण्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर स्थापन झालेल्या समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सीएम नितीशकुमार यांनीही या अहवालाला मान्यता दिली असून या प्रकरणातील आरोपींनी आपली कर्तव्ये पार पाडण्यात अत्यंत दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. पाणी साचण्यास जबाबदार असलेल्या 14 अभियंत्यांना निलंबितही करण्यात आले असून त्यांच्यावर विभागीय कारवाई केली जाणार आहे.

7 अभियंतांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय :
त्याचबरोबर या व्यतिरिक्त 7 कंत्राटी अभियंत्यांनाही कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणात त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असून आरोपी अभियंत्यांनी उत्तर दिल्यावर त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पटना सोबतच इतर भागात पूर आला. या आपत्तीत राज्यात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पटनामध्ये रात्रभर बचावकार्य करून लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. बरेच दिवस लोक भुकेल्या आणि तहानलेल्या परिस्थितीत घरात कैदेत राहिले. यावेळी, कमरेपर्यंत भरलेल्या पाण्यात शिरतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.