Lockdown : शिरूरमध्ये नियम तोडणाऱ्यांकडून 34 हजार 100 रूपये दंड वसुल

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता नगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनाच्यावतीने संयुक्तपणे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून एक दिवसात सुमारे ३४ हजार १०० रूपये दंड वसुल करत मोठी कारवाई केली असल्याची माहिती शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या नियमांचे पालन न करणा-या १६९ दुचाकी चालक, ४ दुकाणांवर, मास्क न वापरणे, चार चाकी वाहणे, सोशल डिस्टन्सींग, दुकानात गर्दी करणे अशा प्रकारे नियम मोडणा-यांवर बुधवार दि. १५ रोजी शिरूरच्या तहसिलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे, मुख्याधिकारी महेश रोकडे, वार्ड अधिकारी, मंडल अधिकारी व वाहतुक पोलीस आदिंच्या संयुक्त पथकाने एकुण ३४ हजार १०० रूपयांचा दंड ठोठावुन वसुल करण्यात आला असल्याची माहिती शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासन ने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करून शहरात कोरोना चा अटकाव करणेस प्रशासनास मदत करावी तसेच व्यापारी आस्थापना यांनीही घालून दिलेल्या सर्व अटींचे व नियमांचे पालन करूनच व्यवसाय करावा अन्यथा ५००० रुपये दंडात्मक कारवाई व ३ दिवसाकरिता दुकान बंद ठेवणेत येईल असा इशारा देऊन कामशिवाय घराबाहेर पडू नये,मास्क चा वापर करावा,बाहेर फिरताना नेहमी परस्परात ६ फूट अंतर ठेवुन प्रशासनाने दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.