सोनाक्षी सिन्हासोबत ‘रिलेशनशिप’मध्ये होता अभिनेता जहीर इकबाल ? आता झाला ‘खुलासा’

पोलिसनामा ऑनलाइन –नोटबुक या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारा अभिनेता जहीर इकबाल एकेकाळी सोनाक्षी सिन्हासोबत नात्यात असल्याचं बोललं जात होतं आणि दोघांच्या नात्याबद्दल खूप चर्चाही झाली आहे. अशा बातम्या आल्या होत्या की, दोघं एकमेकांना डेट करत आहेत. यावर सोनाक्षीनं आणि जहीरनंही कधी काही भाष्य केलं नाही. परंतु आता पहिल्यांदा सोनाक्षीसोबतच्या नात्याबद्दल जहीरनं मौन सोडलं आहे.

एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जहीरनं आपल्या नात्यावर भाष्य केलं आहे. जहीर म्हणाला, “जेव्हा आमच्या अफेअरची बातमी गुगल अलर्टद्वारे मिळाली तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांना मेसेज केला. कारण आम्हाला दोघांना गुगल अलर्टचं नोटीफिकेशन आलं होतं. खूप मैसअप झालं होतं. लोकांना माहिती नव्हतं की, मी कोणाला डेट करत आहे. हे थोडं विचित्र झालं होतं. कारण सोनाक्षीला माहिती होतं मी कोणाला डेट करत आहे.”

जहीर म्हणतो, “या अफवा वाचून आम्ही हसू लागलो होतो. माझ्याबद्दल ही पहिली अफवा असल्यानं मलाही कळत नव्हतं की, कसं रिअॅक्ट करू. आम्ही दोघं अनेकदा चिल करत असतो. हे पाहून लोकांनी आमच्या अफेअरच्या अफवा पसरवल्या.”

जहीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच सलमान खानच्या कभी ईद कभी दीवालीमध्ये काम करताना दिसणार आहे. कारण याबाबत प्रश्न विचारला असता त्यानं काहीही होऊ शकतं असं उत्तर दिलं आहे. जर असं असेल तर मला आनंदच आहे असंही तो म्हणाला.