अभिनेत्री जसलीन मथारूनं ‘लॉकडाऊन’मध्ये केलं लग्न ? व्हिडीओ व्हायरल !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सलमान खानचा शो बिग बॉस 12 ची स्पर्धक जसलीन मथारू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी जसलीन तिच्या लग्नाच्या चर्चांमुळं चर्चेत आली आहे. जसलीननं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिच्या हातात चुडा, भांगेत सिंदूर दिसत आहे. खास बात अशी की, छुप के से या हिंदी गाण्यावर ती डान्स करत आहे.

व्हिडीओला दिलं खास कॅप्शन

व्हिडीओ शेअर करताना जसलीन मथारूनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणते, “चुपके से.” तिच्या कॅप्शनमुळं चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, तिनं लग्न केलंय हे तर तिला सांगायचं नाहीये ना. चाहत्यांना असाही प्रश्न पडला आहे की, हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना. जसलीनं या व्हिडीओसोबत एक फोटोही शेअर केला आहे ज्यात तिच्या भांगेत सिंदूर दिसत आहे.

जसलीनचा हा फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होतान दिसत आहे. अनेकांनी व्हिडीओला लाईक करत शेअर केलं आहेच. काहींनी तिच्या लुकबद्दल तिचं कौतुक केलं आहे. काहंनी तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले आहेत. सोशलवर अनेक चर्चा होताना दिसत आहे.