शिल्पा शेट्टी कुंद्रा दुसर्‍यांदा आई बनली, घरात झाला मुलीचा जन्म, पहा पहिला फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू झाला आहे. शिल्पा एका मुलीची आई झाली आहे. शिल्पानं सोशल मीडियावरून गुडन्यूज दिली आहे. शिल्पाच्या अशा अचानक आई बनण्याच्या बातमीनं सर्वच सरप्राईज झाले आहेत. चाहते तर तिला प्रश्न विचारू लागले आहेत की, ती प्रेग्नंट कधी होती आणि नेमकी कधी आई झाली.

फराह खाननं केली कमेंट

अशात बॉलिवूडची कोरियोग्राफर फरान खाननं शिल्पाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. फराहनं लिहलं आहे की, “थँक गॉड. मी आता जास्त वेळ ही गोष्ट सिक्रेट नाही ठेवू शकत. ब्लेस, ब्लेस आण ब्लेस.” फराह खानच्या या कमेंटवरून स्पष्ट होत आहे की, शिल्पानं जरी ही गोष्ट सर्वांपासून लपवली असली तरी फराह खानला मात्र ही गोष्ट माहिती होती. शिल्पासाठी आज खास दिवस आहे. सर्वजण तिला शुभेच्छा देत आहेत. तिच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे.

शिल्पा शेट्टी 15 फेब्रुवारी 2020 रोजी एका मुलीची आई झाली. शिल्पानं आज म्हणजेच शुक्रवार दि 21 फेब्रुवारी 2020 रोजी ही माहिती पब्लिक केली आहे. परंतु फराह खानला मात्र शिल्पाच्या बेबी गर्लविषयी माहिती होतं हे मात्र नक्की आहे.

शिल्पा दुसऱ्यांदा आई झाली आहे. शिल्पा सरोगसीनं आई झाली आहे. शिल्पानं पोस्टमध्ये म्हटलं की, “ओम गणेशाय नम: आमच्या प्रार्थनांचं उत्तर मिळालं. आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, आमच्या लिटिल एंजलनं आमच्या घरात पाऊल टाकलं आहे. समीशा शेट्टी कुंद्रा. समीशानं 15 फेब्रुवारी 2020 रोजी जन्म घेतला आहे. घरात ज्युनिअर SSK आली आहे.