बॉयफ्रेंड रोहमनच्या ‘या’ स्किलमुळं इम्प्रेस आहे अभिनेत्री सुष्मिता सेन, म्हणाली – ‘हे माझं टॅलेंट नाही’

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री सुष्षिता सेन हिनं आता लॉकडाऊनमध्ये कुकिंगबद्दल आता मजेदार खुलासा केला आहे. तिचं म्हणणं आहे की, ती जरी कुकिंगमध्ये एक्सपर्ट नसली तरी तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल हा त्यात एक्सपर्ट आहे.

सुष्मिता सेन एक चांगली कुक नाही

एका मुलाखतीत सुष्मिता से म्हणाली, “कुकिंग माझं काम नाही. मला फक्त अंडी ब्रेड बनवता येतं माझ्या मुलीसाठी. रोहमन याबाबतीत लकी आहे. तो किचनमध्ये चांगलं काम करतो. तो खूप कमाल कुकिंग करतो. तो माझ्यापेक्षाही चांगली अंडी बनवतो. जो जगातील शानदार कॉफी बनवतो. रिनीही चांगलं जेवण बनवते. अलीशाला असं नाही येत. मला वाटतं की, तिला जर संधी मिळाली तर तीही चांगलं जेवण बनवू शकते. माझ्याकडे यापेक्षा वेगळ्या प्रतिभा आहेत.”

सुष्मिता सेन लॉकडाऊनच्या काळात रोहमन शॉल, तिची मुलगी रिनी आणि अलीशा सोबत आहे. सुष्मिता इंस्टावर खूप सक्रिय असते. फॅन्ससोबत काही फोटो, व्हिडीओ ती नेहमीच शेअर करत असते. चाहत्यांनाही तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप आवडतात. तिनं सोशलवर काही शेअर करायचा उशीर असतो की, ते चाहत्यांमध्ये व्हायरल होताना दिसतं.