अभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं ‘रहस्य’ ! फक्त ‘या’ एका गोष्टीचा करते वापर

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटीया आपल्या अ‍ॅक्टींगसोबतच आपल्या लुक आणि ब्युटीसाठी खूप फेमस आहे. उत्तर भारतातली ही अभिनेत्री दक्षिण भारतीय सिनेमात राज्य करत आहे. तिच्या सौंदर्यांचे लाखो चाहते दीवाने आहेत. तमन्ना सोशलवरून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या एका पोस्टमुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तमन्नानं अलीकडेच तिच्या केसांचं सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. या अभिनेत्रीचं सिक्रेट ऐकल्यानंतर तुम्हीही चकित होऊ शकता. तमन्नाचे केस एवढे चमकदार दिसण्याचं कारण कांदा आहे.

तमन्नानं अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती कांद्याचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करून केसांना लावत आहे. यामुळं केसांचं गळणं कमी होतं. तिनं सांगितलं की, कांद्याचा रस केसांसाठी चांगला आहे. तिच्या नुसार, कांद्यात सल्फर असतं ज्यामुळं कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन मिळतं. यामुळं निरोगी त्वचेच्या पेशी आणि केसांच्या वाढीसाठी मदत मिळते. तमन्नानं आता मात्र हा व्हिडीओ हटवला आहे. तरीही चाहत्यांना तिच्या केसांचं सिक्रेट मात्र माहिती झालं आहे.

तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत बोले चूडिया या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय सीटीमार या तेलगू सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तमन्नानं चांद सा रोशन चेहरा या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मनासारखं काम न मिळाल्यानं तिनं तेलगू आणि तमिळ सिनेमात काम करण्यास सुरूवात केली. तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. हिंमतवाला, द हमशकल्स, खामोशी, बाहुबली, रिबेल, से रा नरसिंहा रेड्डी, अयान, पैरा, सिरुथई, धर्मा दुरै असे अनेक तिचे सिनेमे सांगता येतील.

View this post on Instagram

🦄🦄🦄

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like