अभनेत्री यामी गौतमच्या ‘स्टनिंग’ लुकची सोशल मीडियावर जोरदार ‘चर्चा’ !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री यामी गौतम सध्या चर्चेत असल्याचं दिसत आहे. याचं खास कारणही आहे. सध्या यामीचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी यामी गौतमनं एका मॅगेझीनसाठी फोटोशुट केलं होत ज्याची भरपूर चर्चा झाली होती. यानंतर आता यामीचे पुन्हा काही फोटो समोर आले आहेत ज्यांनी सोशलवर अटेंशन घेतलं आहे.

यामीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये यामी गौतम खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. काही फोटोत ती बोल्ड अवतारात दिसत आहे. समोर आलेल्या काही फोटोंमध्ये तिच्या जुन्या फोटोंचाही समावेश आहे.

यामी वेगवेगळ्या फोटोत अनेक वेगवेगळ्या पोज दिल्याचं दिसत आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या यामीच्या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. अनेकांनी तिचे हे फोटो शेअरदेखील केले आहेत.

यामीनं आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांचं मन जिंकलं आहे. सिनेमाजगतात यामीनं आपलं वेगळं स्थान बनवलं आहे.

https://www.instagram.com/p/B81UlEVlwjm/

यामीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर विकी डोनर या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अनेक वर्षांपासून ती सिनेमात सक्रिय आहे. उरी सिनेमात यामी गौतम शेवटची दिसली होती. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ताबडतोड कमाई केली होती.