Aditya Thackeray | ‘…तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा’ – आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना अतिशय कठोर शब्दात सुनावले आहे. थोडी जरी लाज, हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. निष्ठा यात्रेदरम्यान दहिसर (Dahisar) येथे शिवसैनिकांशी (Shivsena) संवाद साधताना हे वक्तव्य केले. (Aditya Thackeray)

 

आदित्य ठाकरे म्हणाले, जे गेले त्यांना एकच निरोप द्यायचा आहे. जिथे तुम्ही गेलात तिथे आनंदी रहा, सुखी रहा. तुमच्या बद्दल राग, द्वेष नाही. दु:ख निश्चित आहे की आम्ही तुम्हाला शिवसैनिक समजायचो. तुमच्यावर विश्वास ठेवला होता. आता इतकेच सांगायचे आहे की, थोडी जर लाज उरली असेल, हिंमत उरली असेल तर पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा आणि मग जनता जो निकाल देईल तो मला मान्य आहे. (Aditya Thackeray)

 

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मी जिथे-जिथे जात आहे तिथे एवढेच पाहत आहे की जे पळून गेले ते पळून गेले, पण सर्वसाधारण शिवसैनिक हा शिवसेनेसोबतच उभा आहे. प्रत्येक मतदारसंघात असे तगडे शिवसैनिक आहेत, जे म्हणतात आपण लढायला तयार आहोत आणि जिंकायला देखील तयार आहोत.

दोन आठवड्यांपासून जे बघतोय ते दु:खद आहे. अशा लोकांना तिकीट दिल्यानंतर आपले काही लोक नाराज होतात, की आमच्यावर अन्याय झाला. पण बरोबर आहे हे मी मान्य करतो, कारण निवडणुकीत आपण एकालाच तिकीट देऊ शकतो. ते झाल्यावर त्यांच्या प्रचाराला जायचे. सरकार आले तर मंत्रीपदे किंवा महामंडळ द्यायची आणि नाही आले तर त्यांना जपायचे, का ? तर आपल्यापासून पळून जातील.

 

बंडखोर आमदारांची कानउघाडणी करताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला आरोप-प्रत्यारोप करायचे नाही.
जे गेले ते गेले, त्यांच्याबद्दल बोलणार नाही.
त्यांच्यात पण दोन गट आहेत, जे लवकरच कळतील. कारण, एक गट असा आहे ज्याला खरोखर जायचे होते.
त्यांना यातच आनंद मिळतो की हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली उतरवले.
काही लोकांच्या राक्षसी महत्वकांक्षा असतात. काही लोकांना तुम्ही कितीही दिले तरी समाधान नसते.
पण दुसरा गट असा आहे ज्याला पळवून नेले. हे आपल्याला लवकरच समजेल.

 

ज्यांना परत यायचे आहे, त्यांना मातोश्रीचे दरवाजे नेहमीप्रमाणे खुले आहेत. आमचे मन मोठे आहे.
जसा त्यावेळी आम्ही विश्वास ठेवला तसाच विश्वास आम्ही प्रत्येक शिवसैनिकावर टाकत असतो.

 

Web Title :- Aditya Thackeray | resign as mla and face elections shivsena aditya thackerays challenge to rebellious mla

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा