तबलिगी जमातीवरील कमेंटनंतर ‘रेसलर’ बबीता फोगाट म्हणाली- ‘मला जायरा वसीम समजू नका’ ! जायरा, स्वरा आणि ज्वाला गुट्टा म्हणाल्या…

पोलिसनामा ऑनलाइन –अलीकडेच रेसलर बबीत फोगाट हिनं तबलिगी जमातीवरून कमेंट केली होती. यानंतर तिला सोशलवर खूप ट्रोल करण्यात आलं. यानंतर तिनं ट्रोलर्सला उत्तर दिलं. व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली की, मी जायरा वसीम जी गप्प बसेल. तिच्या या वाक्यानं आणखी एका वादाला तोंड फोडलं.

बबीता व्हिडीओ शेअर करत म्हणाली होती की, काही दिवसांपूर्वी तिनं जे काही ट्विट केले होते त्यानंतर तिला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आणि फोन करून काही लोक शिवीगाळ करत आहेत, धमकी देत आहेत. 2014 ची कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट बबीतानं अशा सर्व लोकांना चेतावणी दिली होती की, सर्वांनी कान उघढे ठेवून ऐका की, ती काही जायरा वसीम नाही जी अशा धमक्यांना घाबरून घरात बसेल.

ती म्हणते, की, ती असली बबीता फोगाट आहे जी देशासाठी कायमच लढत आली आहे आणि पुढेही लढणार. बबीता म्हणते की, ट्विटमध्ये तिनं जे काही बोललं होतं त्यावर ती अजूनही कायम आहे आणि पुढेही राहणार कारण तिनं फक्त त्या लोकांच्या विरोधात लिहिलं आहे ज्यांनी संक्रमण पसरवलं आहे.

यानंतर अनेकांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा आणि स्वरा भास्कर यांनीही बबीतावर टीका केली आहे. स्वरा भास्कर म्हणाली, “बबीताजी ही आकडेवारीही बघा. या लाखो भक्तांची कोरोना टेस्ट झाली आहे का ? कृपया यावर कमेंट करावी. तबलिगींच्या कार्यक्रमाला दिल्लीनं परवानदी का दिली हा सवालही विचारावा. बाकी तुमचे चाहते तर आम्हीही आहोत. गुट्टानंही म्हटलं आहे की, आजार कोणता धर्म पाहून नाही होत. याशिवाय जायरानंही सोशलवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

https://www.instagram.com/p/B_F6pfUFkhk/?utm_source=ig_embed

आपल्या पोस्टमध्ये बबीताचा उल्लेख करत जायरा म्हणते, “मी यावर पुरेसा जोर देऊ शकत नाही की, ही प्रशंसा माझ्यासाठी किती संतुष्टीदायक आहे किंवा माझ्यासाठी हे परीक्षण माझ्या इमानासाठी किती खतरनाक आहे. मी एवढीही धार्मिक नाही की, जी इतर लोकांना प्रभावित करेनं. मी लोकांना विनंती करते की, कोणत्याही प्रकरणी माझं कौतुक करू नका.”