धनंजय मुंडेंच्या वक्तव्यामुळं संशयाचं वातावरण, पोलिसांनी सत्य बाहेर आणावं : फडणवीस

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले हे योग्य नाही, पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणावे, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौैऱ्याच्या वेळी व्यक्त केले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज बुधवारी (दि. 13) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, राज्यातील राज्यकर्त्यांना आरोप करण्याची सवयच लागली आहे. महाराष्ट्राला कमी प्रमाणात लस मिळाल्याचा आरोप खोटा असून आपला नाकर्तेपणा लपविण्याचा प्रकार आहे. तसेच कृषी कायदे रद्द करण्या संदर्भात समिती स्थापन केली असून, त्यासंदर्भातील शंका लवकर दूर होतील अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

तसेच औरंगाबाद शहराच्या नामांतरनाबद्दल काँग्रेस शिवसेनेच मिलिजुली असल्याचे देखील फडणवीस म्हणाले. दरम्यान फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. वसंत गिते व सुनील बागूल यांनी भाजपला केलेला रामराम व माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पक्षात पुर्नगमनाच्या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांचा दौरा भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.