‘लाल सिंह चड्ढा’ नंतर ‘या’ बहुप्रतिक्षित बायोपिकच्या तयारीला लागणार आमिर खान !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    टी सीरिजचे (T-Series) संस्थापक गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांच्या बायोपिकची तयार सुरू झाली आहे. गुलशन यांचा मुलगा भूषण कुमार (Bhushan Kumar) यानं याबाबत सांगितलं आहे. बॉलिवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha) नंतर या सिनेमाच्या शुटींगला सुरूवात करेल. त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की, निर्माता दिग्दर्शक नीरज पांडे (Neeraj Pandey) यांच्या बहुप्रतिक्षित विक्रम वेध (Vikram Vedha) चा रिमेक लगेच सुरू होणार नाही. मुगल सिनेमाबद्दल त्यानं सविस्तर माहिती दिली आहे.

भूषण म्हणाला, “कोरोनामुळं सर्व गडबड झाली आहे. आता आमिर खान लाल सिंह चड्ढा सिनेमाचं काम पूर्ण करताच या सिनेमावर काम सुरू करणार आहे. प्रत्येकासाठीचा हा सिनेमा खूप खास आहे. यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.”

https://www.instagram.com/p/CGXjINhhUqK/?utm_source=ig_embed

मुगल सिनेमाबद्दल बोलताना भूषण म्हणाला, “सुरुवातीला जेव्हा या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा अभिनेता अक्षय कुमार हा सिनेमा करणार होता. पंरतु नंतर हा सिनेमा आमिर खानकडे गेला. मुगल सिनेमाचं डायरेक्शन करणाऱ्या सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला तेव्हा आमिरनं त्याचं नाव मागे घेतलं होतं.”

https://www.instagram.com/p/Bu_cbrSBY3F/?utm_source=ig_embed

भूषणनं सांगितलं की, आमिर खान म्हणाला होता की, जोपर्यंत आरोपीला गुन्हेगार घोषित केलं जात नाही तोपर्यंत तो निर्दोष आहे. त्यानंतर आमिरनं या सिनेमात पुनरागमन केलं. आमिर खान सध्या आपल्या लाल सिंह चड्ढा सिनेमाचं शुटींग पूर्ण करत आहे.

https://www.instagram.com/p/B4_nGQ3h3k-/?utm_source=ig_embed