निळ्या रंगाच्या ड्रेसमधील ‘या’ महिला अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा आला आहे. या दिवसात नेत्यांची भाषणे आणि वक्तव्ये चर्चांचा विषय ठरत आहे. या निवडणूकीच्या काळात सध्या चर्चेचा विषय म्हणजे ही महिला अधिकारी. सध्या या महिलेच्या चर्चेला उधाण आले आहे. याचे कारण नेमके काय असू शकते ? ते आपण सविस्तर जाणून घेऊया

ही चर्चेत असलेली महिला म्हणजे रिना द्विवेदी ज्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत. या अधिकारी भोपाळ येथील गोविंदपुरा विधानसभेच्या मतदान केंद्राच्या ड्यूटीवर आहे. या मतदान केंद्रातील महिला अधिकारी यांचा फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. रिना द्विवेदी या आपल्या सहकारी अधिकाऱ्यासोबत हातात ईव्हीएम हातात घेऊन जात आहे. या फोटोची चर्चा खुप होत आहे.

या महिलेच्या हातात ईव्हीएम बॉक्स आहे. ज्याच १५४ आकडा लिहला आहे. हा भोपाळ येथील गोविंदपुरा विधानसभा मतदान केंद्राचा आकडा आहे. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असणाऱ्या महिला अधिकारीबाबत सांगितले जाते की, या अधिकारी भोपाळ गोविंदपुरा विधानसभेच्या मतदान केंद्राच्या ड्यूटीवर होत्या.

लिंबू कलरची साडी नेसलेली महिला एक सरकारी अधिकारी आहे. जी तिच्या स्टाईलिश अदांनी सोशल मिडियाचा चर्चेचा विषय बनली आहे. ही महिला लिंबू कलरच्या साडीमध्ये खुपच सुंदर दिसत आहे. या आधी उत्तर प्रदेशातील पिवळ्या साडीतल्या एका महिला अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता.