लग्नानंतर महिलांच्या स्तनांचा आणि कमरेचा आकार का वाढतो ?

पोलिसनामा ऑनलाइन –अनेकांना असं वाटत असतं की, लग्नानंतर शारीरिक संबंधांमुळे महिलांचं वजन वाढतं. त्यांचे प्रायवेट पार्ट जसं की, स्तन आणि कंबर वाढते. परंतु अनेकांना याबाबतचं सत्य माहिती नाही. हेच आज आपण जाणून घेऊयात.

लग्नानंतर संबंध ठेवल्यानं वजन वाढतं हा तुमचा गैरसमज आहे. सत्य हे आहे की, शारीरिक संबंध एक प्रकारे प्रभावी व्यायाम आहे. याने रक्तवप्रवाह वाढतो आणि कॅलरीज बर्न होतात. यानं वजन आटोक्यात येतं. चांगला व्यायाम झाल्यानं तुम्ही सुखी असल्यानं आणि चांगल्या खाण्यानं निश्चितच वजनात वाढ होऊ शकते.

कारण संबंधांमुळं तुमच्यामध्ये हॅप्पी हार्मोन्स रिलीज होत असतात. ज्यामुळे तुम्ही जास्त आनंदी राहता. याने खालेल्लं अंगाला लागतं. याशिवाय वाढत्या वजनासाठी तुम्ही तुमच्या लाईफ स्टाईलवर लक्ष द्यायला हवं.

याशिवाय असंही एक कारण आहे की, लग्नाआधी महिला फिगरची खूप काळजी घेतात. डाएटवर लक्ष देतात. हेच कारण आहे की, लग्नानंतर त्यांची लाईफ स्टाईल पूर्ण बदलून जाते. त्यांना डाएटकडे जास्त लक्ष देता येत नाही. त्यामुळं त्यांचं शरीर, वजन वाढतं आणि साहजिकच आहे ना जेव्हा वजन वाढेल तर पूर्ण शरीराचा आकार हा वाढतोच ना त्यामुळं कंबर, स्तन यांचाही आकार वाढतो.

काही महिलांचं उलटही असतं. त्यांच्या शरीरात लग्नानंतरही जास्त काही बदल होत नाहीत. त्या आहेत तशाही राहतात.