चिंताजनक ! #MeToo मुळं महिलांच्या नोकर्‍यांवर मोठा परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  #MeToo या सोशल मीडियावर सुरु झालेल्या चळवळीच्या माध्यमातून अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला. भारतातही अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात या मोहिमेअंतर्गत आवाज उठवला होता. यात सिनेसृष्टीसोबत, क्रीडा, उद्योजक अशा सर्वच स्तरांतील महिलांचा समावेश होता. पाश्चिमात्य देशात 2017 मध्ये मी टू या कॅम्पेनला सुरुवात झाली होती.

या मोहिमेमुळे अनेक धक्कादायक गोष्टी जगासमोर आल्या हे खर असलं तर आता त्याही पेक्षा एक खळबळजनक बाब समोर आली आहे. अमेरिकेतील ह्यूस्टन विद्यापीठाने केलेल्या एका सर्व्हेत पुरुष आता आकर्षक आणि सुंदर महिलांना नोकरी देण्याआधी विचार करतात असे म्हटले आहे. ह्यूस्टन विद्यापीठातील प्राध्यापक लीन एटव्हाटर यांनी केलल्या सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे.

या मोहिमेमुळे स्त्रियांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी केल्या गेलेल्या सर्वेनुसार 19 टक्के पुरुषांनी सांगितले की ते आकर्षक महिलांना नोकरी देण्यास तयार नाहीत. तर 21 टक्के पुरुषांनी सांगितले की, ते अशा पदावर महिलांना नोकरी देण्यास तयार नाही जेथे थेट पुरुषांशी संबंध असतो. इतक नव्हे तर या सर्व्हेनुसार 27 टक्के पुरुषांनी असे देखील सांगितले की, ते आता महिलांसोबत मिटिंग देखील करण्यास तयार नाहीत.

पुरुषांमध्ये जागरूकता वाढली
या मोहिमेमुळे पुरुष वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता वाढल्याचे समजते करणं 77 टक्के पुरुषांना माहित आहे कि शोषणाचे प्रकार काय असतात. त्यामुळे आता अनेक पुरुष कामामध्ये महिलांबाबत सुरक्षाच बाळगून असल्याचे आढळून आले.