माव्यासाठी लागणारे अडीच लाखांचे साहित्य जप्त : ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – काटवन खंडोबा येेथे छापा टाकून गुटखा, मावा तयार करण्यासाठी लागणारी सुंगधी तंबाखू, सुपारी आणि मावा तयार करण्याची मशिन असा एकूण २ लाख ५७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आज सायंकाळी ही कारवाई केली आहे.

नगर शहरातील काटवन खंडोबा परिसरातील महारुफ अजीज शेख हे आपल्या राहत्या घराशेजारील एका खोलीत गुटखा, मावा बनविण्यासाठी लागणारी सुंगधी तंबाखू, सुपारी आणि मावा बनविण्यासाठीचे मशिनबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांना गोपनिय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी काटवन खंडोबा परिसरात जाऊन त्या संबंधित खोलीवर छापा टाकला. यावेळी १ लाख ६८ हजार रुपयांची ११२० किलो बारीक सुपारी, ३४ हजार ३२० रुपयांची सुंगधी तंबाखू आणि ५५ हजार रुपयांचे मावा तयार करण्याची मशनरी व वजनकाटा असा एकूण २ लाख ५७ हजार३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी महारुफ अजीज शेख याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई ज्ञानेश फडतरे, सफौ. सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ दत्ता गव्हाणे, मन्सूर सय्यद, पोना रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, मयूर गायकवाड, रणजित जाधव, राहुल सांळुके, रोहित मिसाळ, कमलेश पाथरुट आदींसह अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त किशोर गोरे आदींनी ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त   (www.arogyanama.com)

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान