जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील सर्व 14 पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज संपन्न झाली आहे. पारनेर, नेवासा, शेवगाव येथील सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी राहिले आहे. आरक्षणानुसार राजकीय पक्षांनी सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जिल्ह्यातील आरक्षण पुढीलप्रमाणे : पारनेर : खुला प्रवर्ग, कोपरगाव : अनुसूचित जाती महिला, नगर तालुका : खुला प्रवर्ग महिला, श्रीगोंदा : अनुसूचित जाती, राहुरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पाथर्डी :नागरिकांचा मागास प्रवर्ग, कर्जत : खुला प्रवर्ग महिला, जामखेड : अनुसूचित जमाती, नेवासा : खुला प्रवर्ग, श्रीरामपूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अकोले : नागरिकांचा मागास प्रवर्ग, संगमनेर : खुला प्रवर्ग महिला, राहाता : खुला प्रवर्ग महिला, शेवगाव : खुला प्रवर्ग

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/