अहमदनगर : लॉजवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफास

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वाकोडी फाटा येथील सनराईस लॉजिंग येथे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी छापा टाकून अटक केली. तेथून दोन मुलींची सुटका करण्यात आली. आज रात्री पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

प्रकाश धनाजी सपकाळ (वय २७ रा. सारसनगर, अहमदनगर), रामेश्वर आप्पासाहेब पाटील (वय २७, रा. गंगापूर, औरंगाबाद) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, वाकोडी फाटा येथील सन प्राईस लॉजिंग येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यावरून मिटके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील, पोलीस हवालदार निपसे, पोलीस नाईक काळे, पोलीस नाईक तागड, फसले, पोलीस कॉन्स्टेबल गागडे, जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, भगत, यांचे टीमने सन राईस लाॅजीग येथे छापा टाकला.

अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार 02 मुलीची सुटका करून कुंटणखाना चालवणारे प्रकाश धनाजी सपकाळ (वय २७, रा. सारसनगर, अहमदनगर), रामेश्वर आप्पासाहेब पाटील (वय २७, रा. गंगापूर, औरंगाबाद) यांच्यावर स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3.4.5.7.8 प्रमाणे भिगार कॅम्प पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/