अहमदनगर : कोळपेवाडी दरोड्यातील संशयितांची रेखाचित्रे जारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील श्री लक्ष्मी ज्वेलर्स संगमनेरकर या दुकानावर दरोडेखोरांनी गोळीबार करुन हैदोस घातला होता. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दुकानाचे मालक शाम सुभाष घाडगे यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांचे बंधू गणेश सुभाष घाडगे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना रविवारी (दि.१९) रात्री आठच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांची रेखाचित्र जारी केली आहेत.

कोळपेवाडी येथील श्री लक्ष्मी ज्वेलर्स संगमनेरकर या दुकानावर दरोडा टाकण्यापूर्वी आरोपींनी तीन ते चार दिवस आधी रेकी केली असल्याचा संशय स्थानिक रहिवासी व पोलिसांना आहे. रेकी करणाऱ्या महिलेचे व इतर दोन संशयित इसमांचे रेखाचित्र जारी केले असल्याची माहीती ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली आहे. दरम्यान घटना घडून तीन दिवस उलटले तरीही अद्याप पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळालेले नाहीत. या दरोड्यात २७ लाखांचे दागिने लुटल्याचे निषपन्न झाले असून १४ ते २० जणांच्या टोळीने हे कृत्य केले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेत जखमी झालेला गणेश सुभाष घाडगे यांच्या तब्येतील सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.

कोपरगांव शहरात बाजारतळ भागात जय तुळजाभवानी व्यापारी संकुल मध्ये असलेल्या ओम अलंकार मोरस्कर सराफ व राहुल अलंकार ही तीन दुकाने 6 एपिल 2006 रोजी सायंकाळी साडेसहा ते पावणेसात वाजेच्या दरम्यान फटाके फोडुन दहशत माजवुन पिस्तुलाचा धाक दाखवीत सुमारे दोन कोटी रूपयांची मोठी लुट केली होती. त्याच धर्तीवर कोळपेवाडी येथे रविवारी सायंकाळी लक्ष्मी ज्वेलर्स व्यावसायिकाला ठार करून दहषत माजवुन २७ लाख रूपयांची लुट केली आहे.

[amazon_link asins=’B06XFLY878,B01N6OOW52′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’198862ee-a616-11e8-9e2b-455836d435ab’]
दरम्यान, या घटनेचा महाराष्ट्र सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, जिल्हाध्यक्ष संतोश वर्मा, कार्याध्यक्ष सुभाष मुथा, अध्यक्ष योगेश बागुल, उपाध्यक्ष चंदुकाका उदावंत व सराफ व्यावसायिकांनी निषेध व्यक्त करून या प्रकरणी घटनेचा तपास लागला नाही तर पुढील आंदोलनाची रूपरेशा निश्चित केली जाईल, असा इशारा दिला आहे.

सराफी दुकानावरती गोळीबार करुन दरोडा; १ ठार १ गंभीर जखमी