आकाशात नोकरी करण्यासाठी काय – काय करावं लागतं ? एअरहोस्टेसनं सांगितले ‘रहस्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरहोस्टेसचे आयुष्य खूप ग्लॅमरस आणि खूप मोठा पगार असलेलं असेल असे अनेकांना वाटत असते. जर अशा संस्थेत तुम्ही कामाला असाल तर तुमचे आयुष्य खूप सुखकर आहे असं अनेकांना वाटत असत. परंतु खरे पाहता सर्वात जास्त वाईट अनुभवांचा सामना एअरहोस्टेसला करावा लागतो. हालत कशीही असली तरी त्यांना आपल्या प्रवाशांची देखभाल करावी लागतेच. एअरलायन्सच्या इंडस्ट्रीवर काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे करण्यात आला. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लाईफ बद्दल काही महत्वाचे पैलू सांगणार आहोत.

या सर्वेमध्ये एका एअरहोस्टेसने सांगितले की एकदा एक महिला यात्रेकरू थेट धावत येऊन त्या एअरहोस्टेसच्या गळ्यात पडली. एगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे ही महिला एअरहोस्टेसच्या कुशीत जाऊन अगदी अंगठा चोखु लागली. नंतर या महिलेला तुम्ही असे का केलेत असे विचारले असता मी माझी भीती वाटू नये यासाठी लागणारे औषध खायला विसरली असल्याचे महिलेने सांगितले.

असाच एक विचित्र अनुभव देखील एका एअरहोस्टेसने सांगितलं ती म्हणते,एकदा एका वेड्या प्रवाश्याने एअरहोस्टेसच्या फोनवर टॉयलेट केली. ज्यावेळी एअरहोस्टेसने कामासाठी फोन उचलला त्यावेळी तीला भयानक राग आला मात्र त्यावर नियंत्रण ठेवत ती काहीही बोलली नाही.

एका एअरहोस्टेसचने आपला अतिशय खतरनाक सांगितलं एकदा खराब हवामानामुळे ती विमानाच्या सिलिंगला दोनदा धडकली आणि जोरात खाली पडली. एवढेच नाही तर वर असलेली ट्रॉली सुद्धा तिच्या पायावर पडली आणि तिचे एक हाड देखील तुटले. परंतु तरीही तिला सर्व काम करावेच लागले. ती म्हणते मी एक मुलगी आहे आणि अशा गोष्टींचा मलाही त्रास होतो तरीही परिस्थिती कशीही असो काम हे करावेच लागते.

एका एअरलाईन्स सर्व्हिस एजंटने सांगितले की, एका प्रवाशाने त्याला तिकीट मिळाले नाही म्हणून थेट माझ्याच अंगावर कोल्ड्रिंक फेकले होता. यावरून हेच स्पष्ट होते की कोणाचेही काम सोपे नसते फक्त पाहणाऱ्याला यांचा जॉब खूपच आरामदायक आहे असे वाटत असते.

Visit : Policenama.com