Ajit Pawar | पडळकर आणि मुनगंटीवार यांच्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख, अजित पवार म्हणाले- ‘जसे संस्कार…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अलीकडे महाराष्ट्रात राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप करताना एकेरी भाषेचा उल्लेख केला जात आहे. भाजपाचे (BJP) नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. संस्कार होतील, तसेच ते बोलणार आणि वागणार असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) मुनगंटीवार आणि पडळकर यांच्यावर निशाणा साधला.

 

काय म्हणाले मुनगंटीवार?

भाजपमध्ये ओबीसींचा (OBC) सन्मान होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (BJP Maharashtra State President) ओबीसी आहेत. या देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत. परंतु राष्ट्रवादीमध्ये ओबीसी आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का? छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) स्वत:ला ओबीसी नेते म्हणवतात. मात्र कुठे आहेत ते? त्यांना तिथे महत्त्व नाही.

 

काँग्रेसचा (Congress) पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोकांसमोरील मोठा धोका आहेत.

 

त्यांना चौडी ताब्यात घ्यायची होती

सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकरांनी म्हटले, गेल्यावर्षी अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांच्या जयंतीला पवारांनी मस्ती केली, केली का नाही? यावर्षी पवार का नाही आला? पवार 4 वेळा मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रात मंत्री होता, मागचं मला माहिती नाही. राज्यात 1999 पासून 2014 पर्यंत त्यांचा सरकार होतं, ते एकदाही चौंडीला आले नाहीत. गेल्यावर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती, असा आरोप पडळकर यांनी शरद पवारांवर केला.

 

पण दुसऱ्याकडून अपेक्षा नाही – अजित पवार

यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, संस्कार होतील, तसेच ते बोलणार आणि वागणार. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण, दुसऱ्यांकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्यावर बोलू शकत नाही, असे म्हणत पडळकरांचे नाव घेणं टाळलं.

 

 

Web Title :  Ajit Pawar | ajit pawar on sudhir mungantiwar and gopichand padalkar over sharad pawar comment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘शरद पवारांची देशात विश्वासार्हता राहिली नाही’, शिंदे गटाच्या नेत्याचे टीकास्त्र

Maharashtra Shasan Aplya Dari Scheme 2023 | कोथरूड येथील ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्यात 1 हजार 381 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

Chiranjeevi Konidela | दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीला खरचं झाला आहे का कॅन्सर?, ट्विट करत दिली माहिती