Ajit Pawar | ‘आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही?’, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये (BJP-Shivsena Government) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनावर अजित पवार यांना राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशिवाय आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाची (DyCM Oath) शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजपबरोबर देखील जाऊ शकतो. पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

 

ADV

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत 2024 ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचे सांगितलेय. त्याशिवाय आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही? असा सवाल अजित पवार यांनी केला. तसेच यापुढील सर्व निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचे हित पाहून निर्णय घेतला असल्याचे अजित पवार म्हणाले.

 

अजित पवार पुढे म्हणाले, देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणं गरजेचं. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. कोरोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती. आपण कामाशी मतलब ठेवतो. केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेऊ.
हा निर्णय घेताना बहुतेक आमदारांना हा निर्णय मान्य आहे, असे अजित पवार म्हणाले.

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सत्तेत सहभागी झालो आहोत. पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबत लढवणार आहोत.
नागालँडला निवडणुका झाल्या, तिथे पक्ष भाजपसोबत गेला आहे. काही जण आरोप करतील, साडे तीन वर्षापूर्वी निर्णय घेतला होता.
तेव्हा मविआनं काम केलं. आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजपबरोबर देखील जाऊ शकतो.
पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

 

 

Web Title :  Ajit Pawar | Ajit Pawar’s reaction after taking oath as Deputy Chief Minister
Maharashtra Politics News ncp sharad pawar bjp shivsena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा