ताज्या बातम्यानाशिकराजकीय

Ajit Pawar | अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना, म्हणाले – ‘गाफिल न राहता कामाला लागा, निवडणुका घोषित होऊ शकतात’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | स्थानिक स्वराज्य निवडणुका या ओबीसी आरक्षणामुळे (OBC Maharashtra Reservation) लांबल्या आहेत. मात्र निवडणुका (Maharashtra Municipal Election) केव्हाही घोषित होऊ शकतात असं सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकमध्ये (Nashik) मुंबई नाका (Mumbai Naka) येथील राष्ट्रवादी भवनमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

 

आगामी निवडणुकांमध्ये आघाडीचे अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुका घोषित होऊ शकतात. भाजपचा (BJP) अजेंडा हा निवडणुक, सत्ता, पैसा आणि पुन्हा निवडणुक असा आहे. त्यामुळे गाफिल न राहता कामाला लागावं, असे आदेश अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

 

राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसच्या (Congress) मंत्र्यांनी काय करावं?, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र राष्ट्रवादीशी निगडीत खात्यांचा जाब मंत्र्यांना विचारला जाऊ शकतो. नाशिकला निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्दही पवार यांनी दिला.

 

दरम्यान, कोणतीही कारणं न देता जनतेमध्ये जाऊन पक्षाबद्दल वातावरण निर्मिती करा, असाही सल्ला अजित पवार यांनी दिला.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal),
आमदार माणिक कोकाटे, दिलीप बनकर, सरोज अहिरे, नितीन पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar’s Suggestions to ncp activists, said – ‘Work without being ignorant, elections may be declared’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button