Ajit Pawar Banner In Pune | ‘जत्रेत खेळणार्‍यांनी तालमीत खेळणार्‍या पैलवानाचा नाद करू नये’, पुण्यात अजित पवारांच्या त्या बॅनरची चर्चा, अन्…(व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar Banner In Pune | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या संबंधित काही व्यक्तींच्या साखर कारखान्यांवर आणि त्यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापे (Income tax department raid) टाकले होते. या छापे सत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) संतापाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध कारणांनी चर्चेत आले आहेत. दरम्यान, आता पुण्यात (Pune) अजित पवारांच्या समर्थकाने (supporter) लावलेल्या बॅनरमुळे (Ajit Pawar Banner In Pune) पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. त्यांच्या समर्थनार्थ हे बॅनर लावले गेले असून अजित पवारांच्या हातात तलवार (sword) दिसून येत असल्याचे या बॅनरमध्ये दिसते. या बॅनरमुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, बॅनरबाबत बातम्या झळकल्यानंतर काही वेळातच हे बॅनर काढून टाकण्यात आल्याचं समोर आलंय.

Pune News | पुण्यातील तरूणाचा आनोखा प्रयोग | चक्क नाण्यांपासून बनवले आकर्षक ‘शिवलिंग’

नगरसेवक युवराज बेलदरे (Corporator Yuvraj Beldare) यांनी भारती विद्यापीठ परिसरात अजित पवारांच्या समर्थनार्थ हा बॅनर लावला आहे. “जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करू नये..!’ समझने वाले को इशारा काफी है!,” असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. इतकंच नाही तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी तलवार घेतलेला फोटोही (Ajit Pawar Banner In Pune) आहे.

 

 

किरीट सोमय्यांनी काय केले होते आरोप?

पुणे दौऱ्यावर आलेले किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे सरकार (Thackeray government) आणि पवारांना निरोप देण्याची वेळ आली असून महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हंटले होते. त्याचबरोबर पवार कुटुंबियांवर (Pawar family) निशाणा साधत सोमय्या म्हणाले की, कितने आदमी थे नाही तर पवार साहेब कितने पैसे है, गिन गिन के हिसाब लेंगे अशा शब्दात टीका केली होती.

जरंडेश्वर साखर कारखाना (jarandeshwar sugar factory) सात कंपन्यांना ताब्यात घेतले.
या कारखान्याचे मालक पवार कुटुंबीय आहेत.
बहिणींच्या नावाने अश्रू ढाळू नका, अजित पवार व पवार कुटुंबीय आता उत्तर द्या, असे आव्हान त्यांनी अजित पवार यांना दिले होते.
आजपर्यंत पवार यांच्या 70 बेनामी मालमत्ता आहेत.
त्या सर्व त्यांच्या बहिणी आणि मेहुण्याच्या नावावर आहेत.
ठाकरे सरकार कंट्रोल करणारे शरद पवार (Sharad Pawar) यांनी या चोरीच्या मालमत्ता अजित पवार परत करणार का? यावर उत्तर द्यावं असे सोमय्या म्हणाले होते.
दरम्यान, भारती विद्यापीठ शेजारील परिसरात अजित पवारांच्या झळकलेल्या बॅनरबाबत बातम्या आल्यानंतर काही वेळातच हे बॅनर (Ajit Pawar Banner In Pune) काढून टाकण्यात आल्याचं समोर आलंय.

हे देखील वाचा

Cryptocurrency | 500 रुपयांत सुद्धा Bitcoin मध्ये करू शकता खरेदी, विक्रमी स्तरावर आहे दर

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Corona vaccination in India | भारताचा ऐतिहासिक विक्रम ! कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार

Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा, म्हणाले -‘फडणवीस आणि गडकरी यांच्यात 36 चा आकडा’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ajit Pawar Banner In Pune | banner in pune of deputy cm ajit pawar holding sword ncp supporters kirit somaiya allegation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update