Ajit Pawar | ‘माझी दारूची भट्टी असली तरी मला सुद्धा टायरमध्ये घाला’, अवैध धंद्यावरुन अजित पवारांनी पोलिसांचे उपटले कान

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – माझी दारुची भट्टी (Liquor Furnace) असली तरी मला पकडा आणि टायरमध्ये घाला, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती तालुक्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यावरुन पोलिसांचे (Pune Police) कान उपटले. पाहुणेवाडी येथे रविवारी राष्ट्रवादीच्या (NCP) जनसंपर्क कार्यालयाचे उद्घटन अजित पवार (Ajit Pawar) यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) भाषण करत असताना पाहुणेवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांना अवैध धंद्याबद्दल पत्र दिले. हे पत्र भर सभेत त्यांनी वाचून दाखवले. ते म्हणाले शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार आम्ही येतो दारुच्या भट्ट्या शोधत बसतो. पोलीस निवांत पगार घेतील. तुम्हाला तर मी सॅल्यूटच करतो. मी कितीतरी वेळा सांगतो माझा यात काही हस्तक्षेप नसतो, असे पवार म्हणाले.

 

ग्रामस्थांनी दिलेले पत्र अजित पवारांनी भर सभेत वाचून दाखवले. पुणे ग्रामीण (Pune Rural Police) व
माळेगाव पोलीस ठाण्यांना (Malegaon Police Stations) दारुबंदी होण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता.
मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही, असे पत्रात नमूद केले आहे.
यावेळी अजित पवार यांनी ग्रामस्थांच्या मागणीचे पत्र पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात देत
सह्यांचा कागद मात्र मी माझ्याकडे ठेवतो नाहीतर हे पत्र मला कोणी दिलं त्यांच्या मागे तुम्ही लागाल, असे म्हणत त्यांनी पोलिसांना धारेवर धरले.

Advt.

अजित पवार पुढे म्हणाले, पुढच्या वेळी कोणी पाहुणेवाडीचे मला भेटले तर आवर्जून सांगा
की दादा तुम्ही सांगितल्यानंतर पोलिसांनी दारुबंदीसाठी पावले उचलली.
पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई इतकी आक्रमक करा की, उद्या माझी जरी भट्टी असली तरी मला सुद्धा टायरमध्ये घाला,
परंतु एकही दारू धंदेवाल्याला सोडू नका, अशा शब्दात अजित पवारांनी पोलीस यंत्रणेला भर सभेत सुनावले.

 

 

 

Web Title :  Ajit Pawar | catch me even if i have a liquor furnace and put me in a tyre ajit pawar told the police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा