Ajit Pawar Group NCP | अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निकाल

अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह बहाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेचा निकाल लागल्यानंतर आता राष्ट्रवादीचं काय होणार यासंदर्भात चर्चांना उधाण आले होते. याच दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) निकाल दिला आहे. अजित पवारांचा गट (Ajit Pawar Group NCP) हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालामुळे शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला आहे.

गेल्या सव्वा वर्षांपासून राज्यात कधी नव्हे तेवढी राजकीय वाद सरु झाले आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. अजित पवार यांनी पक्षात बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी केली होती. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार यावर निवडणूक आयोगकडे सुनावणी सुरु होती.

त्यानंतर आज (मंगळवार) निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गट हा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे स्पष्ट करुन पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल असं चित्र दिसतंय.

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्रात, अजित पवारांनी सर्वाधिक आमदार, खासदार आणि पदाधिकारी आपल्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे, असा दावा केला होता. या आमदार-खादारांचं प्रतिज्ञापत्रही अजित पवारांनी निवडणूक आयोगाला दिले होते. तसेच आता आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असल्याचंही आयोगाला कळवलं होतं. यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांची बाजू मांडण्याबाबतची नोटीस दिली होती. मात्र, शरद पवार यांनी सादर केलेली कागदपत्र मागे पडली आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Pune Police News | सराईत गुन्हेगारांना आर्थिक रसद पुरविणारे व्हाईट कॉलरवाले पुणे पोलिसांच्या ‘रडार’वर
Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिस आयुक्तालयातील 700 ते 800 पोलिस कर्मचार्‍यांच्या 15 फेब्रुवारीच्या आत बदल्या – पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात